Bhandara Gangrape महाराष्ट्र पुन्हा हादरला : 35 वर्षीय महिलेवर बलात्कार करून रस्त्यावर फेकले
Maharashtra shook again: 35-year-old woman was raped and thrown on the road भंडारा : राज्यातील अत्याचाराच्या घटना थांबायला तयार नसतानाच 35 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करून महिलेला निर्वस्त्र करून फेकण्यात आल्याची घटना भंडार्यात उघडकीस आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. पीडीता पतीपासून विभक्ते राहते व मदतीच्या बहाण्याने तीन आरोपींनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची बाब उघड झाली आहे.
मदतीच्या बहाण्याने केला अत्याचार
35 वर्षीय पीडीता पतीशी विभक्त् झाल्यानंतर गोंदियातील आपल्या बहिणीकडे आली मात्र तेथेही भांडण झाल्याने तिने रात्रीच घर सोडल्याने ती आईकडे जाण्यासाठी निघाली असताना अज्ञात आरोपीने घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले मात्र त्यांनी तिला घरी न सोडता गोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार जंगलात नेत तिच्यावर अत्याचार केला व आरोपी तिला तिथेच सोडून पसार झाला.

नराधमांनी पुन्हा केला अत्याचार
जंगलात अत्याचार झाल्यानंतर पीडीता तेथून भंडार्यातील लाखनी तालुक्यातील कन्हाळमोह गावातील धर्मा ढाब्यावर पोहोचताच तेथेच नराधम दुसर्या आरोपीशी तिची भेट होताच त्यानेदेखील घरी सोडण्याच्या बहाण्याने पीडितेवर अत्याचार केले. एवढेच नाही तर आरोपीने त्याच्या मित्राला बोलावून घेतले आणि तिला निर्मनुष्य ठिकाणी नेत तिच्यावर वारंवार अत्याचार केलाी. 1 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. यानंतर आरोपींनी महिलेला रस्त्यावरच विवस्त्र सोडून तिथून पळ काढला. ही महिला वेदनांनी रात्रभर तशीच रस्त्यावर पडून होती.
दोन आरोपींच्या आवळल्या मुसक्या
पहाटेच्या सुमारास गावकर्यांनी महिलेला पाहिले तेव्हा ही घटना उघडकीस आली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी महिलेला भंडारा येथील रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीमध्ये महिलेवर अत्याचार झाल्याचे उघड झाली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे तर त्यामधील एक आरोपी हा फरार आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. तर हा गुन्हा गोंदियाच्या गोरेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आलेला आहे.
पीडीतेवर आता नागपूरात उपचार
सामूहिक बलात्कारातील पीडितेची प्रकृती गंभीर असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याने आणखी शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याची माहिती देण्यात आली. भंडारा येथून पीडीतेला पुढील उपचारांसाठी नागपुरातील वैद्यकीय महाविद्यलात हलवण्यात आले असून तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
