A 75 feet high tricolor will be hoisted on August 15 in Muktainagar! मुक्ताईनगरात 15 ऑगस्टला फडकणार 75 फूट उंचीवरील तिरंगा !

आमदार चंद्रकांत पाटील यांचा युद्ध पातळीवर पाठपुरावा


A 75 feet high tricolor will be hoisted on August 15 in Muktainagar मुक्ताईनगर : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे. या गौरवशाली पर्वानिमित भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष संपूर्ण देश साजरा करीत असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या 20 जून 2022 परीपत्रकानुसार हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. प्रत्येक घरावर तिरंगा फडकाविणे याच आदेशाला अनुरूप मुक्ताईनगर शहरातील सौंदर्यात भर म्हणून तसेच जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात , स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/क्रांतीकारक/स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतविलेले स्फुलिंग कायम तेवत राहावे व देश भक्तीची ज्वाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रुजावी या उद्देशाने या दैदीप्यमान इतिहासाचे अभिमान पूर्वक संस्मरण करण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत मुक्ताईनगर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या प्रवर्तन चौकात सुमारे 75 फुटी उंचीचा राष्ट्र ध्वज स्तंभ उभारणीकरीता परवानगी मिळण्याची मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

मुख्याधिकार्‍यांना दिले पत्र
राष्ट्रध्वज स्तंभासाठी लागणारा निधी स्थानिक विकास निधीतून खर्च करण्याची आमदारांची तयारी असून यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांना पत्र दिले आहे. राष्ट्रस्तंभ उभारणीच्या कामाला मंजुरी देण्याासाठी तसेच तांत्रिकरीत्या आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे पत्र देवून मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांच्याकडे देखील पत्रव्यवहार करण्यात आला आहे. 15 ऑगस्ट 2022 रोजी मुक्ताईनगर शहरात सर्वांत उंच असा 75 फुटी तिरंगा फडकण्याची आशा आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !