Attention Railway Passengers : 22 Trains Have Been Cancelled रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या : 22 रेल्वे गाड्या झाल्या रद्द


Attention Railway Passengers : 22 Trains Have Been Cancelled भुसावळ : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नॉन इंटरलॉकींग कामासाठी भुसावळ विभागातून धावणार्‍या 22 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांची ऐनवेळी मोठी गैरसोय होणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये नागपूर विभागात स्टील साइडिंग चालू करण्यासाठी स्टेशनच्या पॅनेलचे यार्ड संशोधक आणि बदल रद्द करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवार, 6 ते रविवार, 14 ऑगस्टदरम्यान हा ब्लॉक घेण्यात आला आहे.

भुसावळ विभागातील प्रवाशांची गैरसोय
भुसावळ विभागातून धावणार्‍या 22 गाड्या रेल्वे प्रशासनाकडून रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला असून ऐनवेळी दुसर्‍या गाड्यांचे आरक्षण मिळणार कसे व इच्छितस्थळी प्रवास करावा कसा ? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. काही गाड्या एक दिवस तर काही गाड्या दोन दिवसांहून अधिक काळासाठी रद्द झाल्या आहेत.

या 22 गाड्या झाल्या रद्द : कंसात कालावधी
18030 शालिमार-लोकमान्य टिळक टमिर्नस, 18029 लोकमान्य टिळक टर्मिनस ते शालिमार (8 ते 12 ऑगस्टपर्यत रद्द), 22846 हटिया-पुणे (8 ते 12 ऑगस्ट) तर (10 ते 14 ऑगस्ट), 13425 मालदा टाउन-सुरत (6 ते 13 ऑगस्ट), 13426 सुरत-मालदा टाउन (8 ते 15 ऑगस्टपर्यंत), 225894 हावडा-शिर्डी साईनगर (11 ऑगस्ट), 22893 शिर्डी साईनगर-हावडा (13 ऑगस्ट), 22905 ओखा-शालिमार (7 ऑगस्ट), 22906 शालिमार- ओखा एक्स्प्रेस (9 ऑगस्ट), 12812 हटिया-एलटीटी (12 व 13 ऑगस्ट), 12811 एलटीटी-हटिया (14 व 15 ऑगस्ट), 12905 पोरबंदर-शालिमार (10 व 11 ऑगस्ट), 12906 शालिमार-पोरबंदर (12 व 13 ऑगस्ट), 12810 हावडा-सीएसएमटी (8 ते 13 ऑगस्ट), 12809 मुंबई-हावडा (8 ते 13 ऑगस्ट), 12834 हावडा- अहमदाबाद (8 ते 13 ऑगस्ट), 12833 अहमदाबाद-हावडा (8 ते 13 ऑगस्ट), हावडा-पुणे व हावडा-पुणे या गाड्या (8 ते 13 ऑगस्ट), 12101 एलटीटी-शालिमार (7 व 9 ऑगस्ट), 12102 शालिमार-एलटीटी ही गाडी (8, 10 व 11 ऑगस्ट) रोजी रद्द करण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !