लंपी स्किन डिसीज : सावद्यातील आज भरणारा गुरांचा बाजार रद्द


सावदा : सावदासह परीसरात गुरांवर लंपी स्किन डिसीज आल्याने अनेक गुरे मृत्यूमुखी पडत आहेत. यामुळे पशूपालक चिंताग्रस्त झाले आहेत. गुरांच्या अंगावर सुरुवातीला पुरळ उठतात नंतर सूज येऊन अंग खांद्यावर सूज येऊन ताप येतो व आठवडाभरातच गुरे मृत्यूमुखी पडत आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याची स्थिती आहे. आजाराच्या अनुषंगाने रविवार, 6 रोजी सावदा शहरात भरणारा गुरांचा बाजार रद्द करण्यात आला आहे.

सावद्यात गुरांचा बाजार रद्द
लंपी आजाराचा विषाणू व त्याची फैलावण्याची गती लक्षात घेता सावदा येथील सर्वात प्रसिद्ध असा गुरांचा रविवारी भरणारा बाजार जळगाव जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने बंद ठेवण्यात आला आहे. ऐन पोळा सण तोंडावर असतानाच शेतकरी नवीन बैलजोडी खरेदीच्या बेतात असतानाच लंपी स्किन डिसीजने थैमान घातल्याने पशूपालक धास्तावले आहेत. शासनाने याबाबत गंभीर पावले उचलावीत, अशी शेतकरी वर्गातून अपेक्षा आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !