भल्या पहाटे चारचाकी चालकास धक्का मारून मोबाईल लांबवला : बाजारपेठ पोलिसांनी आवळल्या 15 तासात आरोपीच्या मुसक्या


In 15 hours after the police raided the market, the accused’s smile भुसावळ : शहरातील जामनेर रोडवर शुक्रवारी पहाटे 3.30 वाजता येथील भाजी मार्केटमध्ये पिकअप वाहनाने भाजीपाला आणणार्‍या चालक सुपडू पुंडलीक डोळे (रा. कापुसवाडी, ता.जामनेर) यांना खाली उतरवित त्यांना धक्का मारत त्यांच्या खिश्यातील मोबाईल लांबवणार्‍या आरोपीच्या बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या 15 तासातच अटक केली. कृष्णा उर्फ शूटर मिलिंद गायकवाड (भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
सुपडू डोळे यांच्या गाडीला पहाटे 3.30 वाजता पिकअप गाडीला हात देऊन अष्टभुजा देवी समोर गाडी थांबविली असता, संशयीताने डोळे यांच्या खिश्यातील मोबाईल हिसकावला व डोळे यांना धक्का मारून पाडले व पळून गेला. याबाबत बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी हवालदार प्रशांत सोनार यांना गुप्त माहिती मिळाल्याने शहरातील कृष्णा उर्फ शूटर मिलिंद गायकवाड याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील विजय नेरकर, प्रशांत सोनार, सचिन चौधरी, उमाकांत पाटील, जावेद शहा, जिवन कापडे, समिर तडवी यांनी संशयीताच्या मुसक्या शुक्रवारी सायंकाळी आवळल्यात. त्याच्याकडून दहा हजार रूपये किंमतीचा मोबाईल जप्त केला. पुढील तपास विजय नेरकर करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !