Nimkhedi Naib Subhedar died a heroic death निमखेडीतील नायब सुभेदाराला वीर मरण


Nimkhedi Naib Subhedar died a heroic death  मुक्ताईनगर : तालुक्यातील निमखेडी येथील मूळ रहिवासी तथा सैन्यदलात नायब सुभेदार म्हणून कार्यरत असणारे विपीन जनार्दन खर्चे यांना वीरगती प्राप्त झाली आहे.

दरीत कोसळले वाहन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून निमखेडी येथील मूळ रहिवासी तथा सध्या भारतीय सैन्यदलात नायब सुभेदार म्हणून कार्यरत असणारे विपीन जनार्दन खर्चे यांना हौतात्म्य प्राप्त झाल्याची माहिती दिली आहे. नायब सुभेदार विपीन खर्चे हे जम्मू-काश्मिरातील उधमपूर येथे सेवेत होते. त्यांचे वाहन दरीत कोसळल्याने त्यांना विरमरण प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.


कॉपी करू नका.