सामाजिक भावना दुखावणारे स्टेटस व्हायरल : सावखेडा येथील संशयीत ताब्यात
Viral status that hurts social sentiments: Suspect detained in Savkheda यावल : तालुक्यातील सावखेडासीम येथे एकाने एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील असे आक्षेपार्ह स्टेटस सोशल मिडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत अल्पवयीन असल्याने त्यास समजपत्र देवून सोडण्यात आले.
धार्मिक भावना दुखावणारे स्टेटस टाकले
यावल तालुक्यातील सावखेडासीम गावातील अल्पवयीन तरुणाने एका समाजाने लावलेल्या ध्वजांच्या फोटोला इडिट करीत त्यात अन्य ध्वज सहभागी करून त्यात धार्मिक तेढ निर्माण करणारे वाक्य टाकून तसे स्टेटस व्हॉटसअॅपवर ठेवले. हा प्रकार गावात व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला. संतप्त जमाव आरोपीच्या घरावर चालून येत असल्याची माहिती फैजपूर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना मिळताच त्यांनी ताफ्यासह धाव घेत शांतता निर्माण केली. यावल पोलीस ठाण्यात संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.




