Tomorrow is the time for the Shinde government to expand the cabinet विधान परीषदेतील नेत्यांना मंत्री मंडळात स्थान नाही ? ; शपथविधीकडे लागले लक्ष


Tomorrow is the time for the Shinde government to expand the cabinet मुंबई  : शिंदे सरकारने मंत्री मंडळ विस्तारासाठी मंगळवारचा मुहूर्त शोधला असून काळी 11 वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राजभवनावर त्या अनुषंगाने तयारी देखील सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विधान परीषदेतील नेत्यांना मंत्री मंडळात स्थान मंगळवारच्या विस्तारात मिळणार नाही. दरम्यान, हा शपथविधी राजभवन ऐवजी विधी मंडळातही होण्याची शक्यता आहे.

यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता
प्रविण दरेकर आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपद मिळेल अशी शक्यता होती मात्र भाजप पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरेल, अशी शक्यता आहे. विधान परीषदेतील नेत्यांना तूर्त मंत्री मंडळात स्थान नाही, असं भाजपनं ठरवलं आहे. त्यामुळे दरेकर, बावनकुळे, शिंदे आणि पडळकर यांना मंत्री मंडळात स्थान मिळण्याची शक्यता धूसर आहे तर दुसरीकडे मंत्री मंडळ विस्तारात भाजपकडून 9 ते 12 जणांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यात चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे-पाटील, अतुल सावे, सुरेश खाडे या सहा जणांना मुंबईतून फोन आल्याने त्यांना मंत्री पद निश्चित असल्याचे मानले जात आहे.



कॅबिनेट विस्ताराची शक्यता
सोबतच कॅबिनेट विस्तार देखील होणार आहे. सूत्रांचे असे म्हणणे आहे की, मंत्रिमंडळाबाबत सर्व काही ठरले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही तासांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !