भुसावळ पालिका निवडणुकीसाठी आघाडी करून काँग्रेसला 10 जागा द्याव्यात
काँग्रेस शिष्टमंडळाचे माजी आमदार संतोष चौधरींकडे प्रस्ताव
10 seats should be given to Congress by forming a coalition for the Bhusawal Municipal Elections भुसावळ : भुसावळ पालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच राजकीय आखाडा तापण्यास सुरूवात झाली आहे. भुसावळ पालिकेच्या निवडणुकीत आघाडी करून काँग्रेसला दहा जागा द्याव्यात, अशी मागणी शहर काँग्रेस कमिटीने राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्याकडे नुकतीच केली.
आगामी निवडणुकीबाबत मंथन
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांच्या कार्यालयात तासभर चाललेल्या बैठकीत राष्ट्रवादी व काँग्रेसने पालिका निवडणूक सोबत लढवावी. काँग्रेसला दहा जागा द्याव्या, असा प्रस्ताव यावेळी काँगे्रस पदाधिकार्यांनी दिला. यावेळी दिलेल्या प्रस्तावाबाबत वरिष्ठांना कळवू असे चौधरींनी सांगितले. शहराध्यक्ष नितीन धांडे उपस्थित होते.


समविचारांना सोबत घेण्याचे सुतोवाच
गेल्या आठवड्यात घेतलेल्या पत्रकार परीषदेत माजी आमदार संतोष चौधरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पालिका निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस व इतर लहान समविचारी पक्षांना सोबत घेवून लढेल, असे सूतोवाच केले होते. या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री काँग्रेसचे भुसावळ शहराध्यक्ष रवींद्र निकम, काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मो.मुन्वर खान यांनी माजी आमदार चौधरींची भेट घेतली.