It is clear that a 28-year-old youth of Bhadli village was murdered भादली गावातील 28 वर्षीय तरुणाचा खून झाल्याचे स्पष्ट

कडगाव रस्त्यावरील शेतात आढळला मृतदेह : संशयीतांचा कसून शोध


It is clear that a 28-year-old youth of Bhadli village was murdered नशिराबाद : जवळच असलेल्या भादली गावातील 28 वर्षीय तरुणाचा निर्घूण खून करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी आढळल्याने या परीसरात खळबळ उडाली आहे. संकेत लिलाधर आढाळे (28, भादली) असे मयत तरुणाचे नाव आहे. कडगाव रस्त्यावरील पाटचारीजवळ असलेल्या शेतात तरुणाचा मृतदेह आढळला असून मध्यरात्री खून झाल्याचा अंदाज आहे.

रात्रीच घराबाहेर पडला होता तरुण 
संकेत आढाळे हा तरुण मंगळवारी रात्री 10.15 वाजता घराबाहेर पडल्याची माहिती त्याच्या कुटूबियांनी दिली मात्र रात्र उलटूनही तो घरी परत न आल्याने त्याचा शोध सुरू करण्यात आला होता मात्र बुधवारी सकाळी कडगाव रस्त्यावरील पाटचारीला लागून असलेल्या एका शेतकर्‍याच्या शेतात या तरुणाचा मृतदेह आढळला. तरुणाच्या शरीरावर धारदार शस्त्राने अनेक वार केल्याचे स्पषट झाले आहे.

पोलिस अधिकार्‍यांची धाव
खुनाची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, नशिराबादचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, एएसआय अलियार खान, समाधान पाटील, किरण बाविस्कर, संजय जाधव, बाळू पाटील आदींनी धाव घेत पंचनामा केला.

संशयीतांची चौकशी
तरुणाचा खून झालेला मृतदेह ज्या ठिकाणी आढळला तेथे फॉरेन्सिक टिमसह श्वान पथकाला पाचारण करण्यात आले मात्र चिखलामुळे श्वानाला आरोपींचा माग काढता आला नाही. मंगळवारी रात्री 10.15 वाजेनंतर तरुण घराबाहेर पडल्याने त्याचा कुणा-कुणाशी संपर्क झाला, तो कुणाबाहेर बाहेर पडला याबाबची माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे. तरुणाचा खून नेमक्या कोणत्या कारणावरून करण्यात आला हे अद्याप अस्पष्ट असलेतरी पूर्ववैमनस्य हे कारण असल्याचे गृहित धरून त्या दिशेने तपास केला जात आहे. गावातील काहींना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.


कॉपी करू नका.