यावलला डॉ.कुंदन फेगडे यांच्यातर्फे मोफत राष्ट्रीय तिरंगा ध्यज वाटप


यावल : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तथा आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे यांच्या वतीने मोफत राष्ट्रध्वज वाटपाला सुरुवात करण्यात आली. शहरातील भाजपाच्या तालुका संपर्क कार्यालयात क्रांती दिनाच्या औचित्याने यावल येथील माजी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्या तर्फे मोफत राष्ट्रीय ध्यज तिरंगा वाटप करण्यात सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी हिरालाल चौधरी यांच्याहस्ते ध्यज वितरण करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक आण्णा पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपूत, विलास चौधरी, भाजयुमो जिल्हा ग्रामीण सरचिटणीस राकेश फेगडे, भाजपा ओ.बी.सी.सेलचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे, यावल शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, उदय बाविस्कर, सलीम तडवी , अतुल भालेराव, भूषण फेगडे, रीतेश बारी, स्नेहल फिरके, परीष नाईक, मनोज बारी आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !