‘हर घर तिरंगा’ अभियानाची व्यापक जनजागृती

प्रत्येक घरावर तिरंगा फडकणार : भुसावळ विभागात पथनाट्याद्वारे प्रबोधन : सामाजिक संघटनांतर्फे तिरंगा ध्वजाचे वाटप


भुसावळ : संपूर्ण देशात व राज्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेच 75 व्या वर्षानिमित्त केंद्र शासनातर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येणार असून देशातील प्रत्येक घरावर नागरिकांतर्फे तिरंगा फडकविण्यात येणार आहे. याच अनुषंगाने आपला राष्ट्रध्वजाची संहिता व कायदे आणि राष्ट्रध्वजाचा कुठेही अवमान होऊ नये यासाठी भुसावळ विभागात पथनाट्याद्वारे प्रबोधन करण्यात येत आहे.

मुक्ताईनगरात पथनाट्याद्वारे प्रबोधन
मुक्ताईनगर : पंचायत समिती, मुक्ताईनगर व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, गटशिक्षणाधिकारी बी.डी.धाडी, पंचायत समितीचे कार्यालयीन अधीक्षक सुधाकर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी राजू तडवी यांच्या संकल्पनेतून तसेच मनोज लुल्हे दिग्दर्शित ‘हर घर तिरंगा’ हे पथनाट्य मुक्ताईनगर शहरात आयसीआयसीआय बँकेजवळील प्रवर्तन चौकात, बसस्थानक तसेच अंतुर्ली व कुर्‍हा भागात गर्दीच्या ठिकाणी प्रभावीपणे सादर करण्यात आल

यांची होती उपस्थिती
मुक्ताईनगरात प्रवर्तन चौकात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी यामिनी पाटील, महिला पदाधिकारी उपस्थित होते. पथनाट्य सादरीकरणात आशा कोळी (मुक्ताईनगर), चित्रा भारंबे (मुक्ताईनगर), शुभांगी वरुडकर (हरताळे), पल्लवी कळमकर (उचंदा), अनिल पवार (घोडसगाव), विलास पाटील (निमखेडी बु.॥), प्रवीण मदार (उचंदे), गौतम ननीर (घोडसगाव), सोमनाथ गोंडगिरे (निमखेडी बु.॥), मनोज लुल्हे (अंतुर्ली), निलेश कदम (मुक्ताईनगर) आदी शिक्षकांनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचायत समिती व शिक्षण विभागातील सर्व कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतले.

कुर्‍हा येथे पटनाट्याद्वारे जनजागृती
कुर्‍हाकाकोडा : ग्रामपंचायत कार्यालयासमोर अभियान राबविण्यात आले. स्व.अशोक फडके माध्यमिक विद्यालय शिवाजी हायस्कूल व आश्रमशाळा, कुर्‍हा यांचे सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. पथनाट्य प्रसंगी कलाकार मनोज लुल्ले, अनिल पवार, प्रवीण सदार, गौतम ननिर, सोमनाथ गौडगीर, विकास पाटील, निलेश कदम, महेंद्र मालवेकर, शुभांगी वरूळकर, आशा कोळी, चित्रा भारंबे, पल्लवी कळमकर, कुर्‍हा सरपंच सुनीता मानकर, उपसरपंच पुंडलिक कपले, ग्रामविकास अधिकारी योगेश पवार, भैया कांडेलकर, अस्लम, दिनकर गुरव आदींनी सादर केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !