भुसावळात रेल्वे कर्मचार्यांच्या न्याय मागण्यांसाठी कामगार सेनेचे धरणे आंदोलन
भुसावळ : छत्रपती शिवाजी महाराजांचा डीआरएम कार्यालयाच्या स्वागत कक्षाजवळ बसवावा, स्पॅड केसमध्ये दोषींना एकच न्याय द्यावा, ट्रॅकमन लोकांना रीलीव्ह करण्यात यावे, एलडीसीई, जेडीसीई परीक्षा सर्व विभागातून घेण्यात याव्यात आदी न्याय मागण्यांसाठी मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता डीआरएम कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. प्रसंगी मागण्यांचे निवेदन एडीआरएम रुखवैय्या मीना यांना देण्यात आले.
यांची आंदोलनात उपस्थित
रेल्वे कामगार संघटनेचे मंडल अध्यक्ष ललितकुमार मुथा, प्रीतम टाक, योगेश माली, विनोद वाघे, रामदास आवटे आदींसह प्रदीप भुसारे, अरविंद थोरात, कमलाकर बाणाईत, महेंद्र भोले, पंकज ठाकरे, रमेश मराठे, सुरेंद्र यादव, गोकुल महाजन, संजय चौधरी, मोहन राजपूत, राजू सिंग, मोहम्मद रफिक, प्रकाश करसाले, गोपाल बाबू पाटील, बबलूकुमार, प्रवीण कोळी, मुकेश महाजन, शांताराम सपकाले, एम.के.शहा, संतोष देशमुख, मनोज गावंडे, रमेश भोकरे, मानवेंद्र वर्मा, भरत शर्मा, निरंजन राऊत, दीपक तायडे व इतर कामगार उपस्थित होते.

