Income Tax Department Raids In Jalna : 390 Crore Unaccounted Assets Seized आयकर विभागाची जालन्यात छापेमारी : 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त
Income Tax Department Raids In Jalna : 390 Crore Unaccounted Assets Seized जालना : जालना शहरातील चार स्टील कारखानदारांकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाल्यानंतर सोमवार, 1 ऑगस्टपासून छाप्यांना सुरूवात रकण्यात आली. स्टील कारखानदारांच्या घरं आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले तर बुधवारी रात्री उशीरापर्यंत ही कारवाई आटोपल्यानंतर इन्कम टॅक्स खात्याने याबाबतची माहिती जाहीर केली. त्यात 390 कोटींचे घबाट सापडल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये 58 कोटी रुपयांची रोकड आणि 32 किलो सोन्याचा समावेश आहे. प्राप्तीकर खात्याचे तब्बल 260 कर्मचारी या छापेमारीत सहभागी झाले होते.
विवाहाचा ताफा दाखवून केली छापेमारी
विशेष बाब म्हणजे या कारवाईचा कुणालाही सुगावा लागू नये म्हणून ही सर्व पथके दुल्हन हम ले जायेंगे असे स्टीकर्स चिपकावलेल्या वाहनांमधून आले होते. अर्थात, विवाहाचा ताफा दाखवून आयटी खात्याच्या अधिकार्यांनी छापेमारी केली.

14 तासांच्या अवधीनंतर रोकड मोजण्यात यश
छापेमारीदरम्यान मोठी रोकड जप्त करण्यात आली. ही रोकड मोजण्यासाठी आयकर विभागाने 12 मशीन वापरल्या व ही सर्व रोकड मोजण्यासाठी तब्बल 14 तासांचा अवधी लागला. यावरून मराठवाड्यातील ही कारवाई किती मोठी असेल, याचा अंदाज येईल. जालन्यातील स्टील व्यावसायिकांकडे रोकडे आणि सोन्याबरोबरच हिरे, मोती असा ऐवजही आढळून आला.
आठ दिवस चालली छापेमारी
आयकर खात्याच्या या छापेमारीची माहिती अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. 1 ऑगस्ट रोजी हे छापासत्र राबवण्यास सुरुवात झाली, 8 ऑगस्टपर्यंत सुरु होते. या मोहीमेत एकूण 260 कर्मचारी दाखल झाले होते. इतक्या मोठ्याप्रमाणात आयकर खात्याचे कर्मचारी जिल्ह्यात दाखल झाल्याचा सुगावा कोणालाही लागू नये, यासाठी हे सर्वजण वेगवेगळ्या वाहनांतून याठिकाणी दाखल झाले होते. या कारवाईत जालना जिल्ह्यातील चार बड्या स्टील कारखानदारांची झडती घेण्यात आली. एकाचवेळी आयकर विभागाची विविध पथकं या स्टील उत्पादकांशी संबंधित असलेल्या मालमत्तांवर छापे टाकत होती. त्यावेळी आयकर खात्याच्या हाती मोठे घबाड लागले.
औरंगाबादमध्येही कारवाई
या छाप्यांमध्ये औरंगाबाद येथील एका व्यावसायीकावरदेखील कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे मात्र त्याचा तपशील स्पष्ट झालेलीा नाही
