Chinu Popli murder case in Dhule : Arrested along with suspended policeman धुळ्यातील चिनू पोपली खून प्रकरण : निलंबित पोलिस कर्मचार्‍यास अटक


Chinu Popli murder case in Dhule : Arrested along with suspended policeman धुळे : साक्री रोडवरील चिनु उर्फ चंदन राजेंद्र पोपली याच्या खूनप्रकरणी शहर पोलिसांनी तिसरा संशयित आरोपी असलेला सस्पेंड पोलीस कर्मचारी लिंगायतला गजाआड केले . त्यास नाशिक येथून ताब्यात घेतले . याप्रकरणी खूनातील तिघा संशयिताची न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

उधारीच्या पैश्यावरून खून
केवळ तीन हजार चारशे रूपयांवरून चिनू पोपलीला तिघा आरोपींनी गोळी झाडून खून केला होता. या प्रकरणी शहर पोलिसांत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्यात शहर पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवत संशयीत भटू चौधरी आणि यासीन पठाण या दोघांना पकडले होते मात्र तिसरा संशयीत आरोपी पसार झाला. तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टादेखील पोलिसांनी हस्तगत केला. या घटनेत तिसरा संशयीत व निलंबित पोलिस कर्मचारी पंकज बाळकृष्ण लिंगायत याचे नांव तपासात आल्याने धुळे शहर पोलिसांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास नाशिक येथून संशयित आरोपी पंकज लिंगायतला ताब्यात घेत अटक केली. या खूनप्रकरणी संशयी आरोपी भटू चौधरी, यासीन पठाण आणि पंकज लिंगायत यांना बुधवार, 10 रोजी न्यायालयात हजर केले असता तिघांना 13 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !