यावलच्या केळी व्यापाऱ्याला साडेचार लाखांचा गंडा


यावल : शहरातील एका लहान केळी व्यापाऱ्याकडून केळी घेऊन पैसे दिले नाही म्हणून चार केळी व्यापारी विरूध्द यावल पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ लाख १९ हजारांची केळी उधार घेतली पैसे मांगीतल्यावर मारहाण करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमुद आहे.

यावल पोलिसात गुन्हा
यावल शहरातील सईदपुरा भागातील रहिवासी लुकमान खान सुलतान खान या केळी व्यापाऱ्याने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार ते केळीचा छोटा व्यापार करतात व त्यांनी अनेक शेतकऱ्यांकडून केळी एकत्रीत करीत २८ फेब्रुवारी २०२१ ते २३ मार्च २०२१ या दरम्यान वेळोवेळी ४ लाख १९ हजार ७८६ रूपयाची केळी यावल शहरातील बाबा नगर भागातील रहिवासी केळीचे मोठे व्यापारी शेख लतीफ शेख नासिर, शेख वसीम शेख लतीफ, शेख रईस शेख लतीफ व शेख फैजान शेख रईस यांना उधार दिली होती मात्र या चौघा व्यापाऱ्यांनी त्यांना अद्यापही सदर केळीचे पैसे दिले नाही. वर्षभरापासून त्यांच्याकडे पैशांची मागणी करत असतांना त्यांनी पैसे दिले नाही उलट फिर्यादी यांना चाप्टा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा या चौघांनी आपल्याकडून उधार केळी घेतली व आपला विश्वासात करून फसवणूक केली म्हणून चौघाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !