भुसावळातील प्रभाग 25 मध्ये डॉ.छाया देशमुख यांच्याकडून राष्ट्रध्वजाचे वितरण
भुसावळ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत भुसावळातील प्रभाग
25 मध्ये रूपेश देशमुख तसेच डॉ.छाया रुपेश देशमुख (फालक) यांच्यातर्फे शुक्रवार, 12 ऑगस्ट रोजी घरोघरी राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले. यावेळी रुपेश देशमुख तसेच डॉ.छाया देशमुख (फालक), लखन देशमुख, रजत शिंदे, मयुर अंजाळेकर, प्रशांत भट, नीरज बाणाईत, राहुल वाघ, कौस्तुभ नारखेडे, नंदलाल भोई, देवेश पाटील, नरेंद्र अहिरकर, उज्वल घोगरे आदी उपस्थित होते. नागरीकांनी सन्मानपूर्वक राष्ट्रीय ध्वजाखाली उतरावा, असे आवाहन केले आहे.

