अॅक्सीस बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून घातला लाखाचा गंडा
Claiming to be an officer of Axis Bank, he extorted lakhs of rupees भुसावळ : तालुक्यातील निंभोरा येथील नोकरदार तरुणाचा अॅक्सीस बँकेचा क्रेडीट कार्ड अधिकारी बोलत असल्याचे सांगून भामट्याने एक लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा
तक्रारदार पवन ज्ञानेश्वर जावरे (24, शिवाजी नगर, निंभोरा बु.॥, ता.भुसावळ) यांच्या मोबाईलवर 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता 18605005555 या क्रमांकावरून आलेल्या फोनवरील व्यक्तीेन आपण अॅक्सीस बँक क्रेडीट कार्ड विभागाचा अधिकारी बोलत असल्याचे सांगून दिशाभूल करीत ओटीपी क्रमांक मिळवून 99 हजार 519 रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला. या प्रकरणी गुरुवारी जावरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक विलास शेंडे करीत आहेत.

