मस्कावदमध्ये देशी दारू दुकानात नियम ढाब्यावर बसवून होते विक्री


सावदा : सावदा येथून जवळ मस्कावद येथील देशी दारू दुकानात नियम धाब्यावर बसवून दारूची विक्री होत असल्याचा आरोप आहे तर उत्पादन शुल्क विभागाचे याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचा आरोप आहे.

उत्पादन शुल्क विभागाची डोळेझाक
मस्कावद येथे असलेले देशी दारू दुकान हे किरकोळ विक्रीसाठी असतांना येथून सर्रास ठोक होलसेलरीत्या विविध ठिकाणी जवळच्या लहान गावात दारुची विक्री होतांना दिसत येते. या दुकानास किरकोळ विक्री परवाना असताना होलसेल विक्री कशी होते? असा प्रश्न उपस्थित हेात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची या प्रकाराकडे डोळेझाक होत आहे. देशी दारू विक्री दुकानास सकाळी दुकान उघडणे व बंद करण्याची नियमावली आहे मात्र असे असतानाही या नियमांना हरताळ फासली जात असल्याचा आरोप आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तपासणी करून कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !