Corruption in Raver Personal Toilet Scheme : Notice from Mumbai Lokayukta रावेरात वैयक्तिक शौचालय योजनेत भ्रष्टाचार : मुंबई लोकायुक्तांकडून दखल
Corruption in Raver Personal Toilet Scheme : Notice from Mumbai Lokayukta रावेर : रावेर पंचायत समितीतील बहुचर्चित वैयक्तीक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणाची उपलोक आयुक्त, मुंबई यांनी दखल घेतली आहे. या प्रकरणासंदर्भात त्यांनी विभागीय आयुक्त नाशिक यांना चौकशीचा अहवाल मागितला आहे.
चौकशी अहवाल मागितला
रावेर पंचायत समितीतील बहुचर्चीत शौचालय योजनेतील भ्रष्टाचार प्रकरण राज्यभर गाजत आहे. या प्रकरणाची दखल मुंबई उपलोक आयुक्त संजय भाटीया यांनी दखल घेतली आहे. त्यांनी या संदर्भात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना चौकशी करून अहवाल मागविला आहे. आतापर्यंत या प्रकरणा संदर्भात रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक गट विकास अधिकारी, सेवानिवृत्त विस्तार अधिकार्यांसह अठरा संशयीत कारागृहात आहे. अद्याप अनेक जण पोलिस प्रशासनाच्या रडारवर असून या गुन्ह्याचा सखोल तपास सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.

