रावेरात अनोळखी इसमाने घेतला गळफास


A Stranger in Rawer Hanged Himself रावेर : शहरातील स्टेशन रोडवरील ग्रामीण रुग्णालयानजीक निर्वस्त्र अवस्थेतील एका अनोळखी इसमाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी धाव घेतली.

अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
रावेर शहरात स्टेशन रोडवरील ग्रामीण रुग्णालयाजवळ अतिक्रमणात असलेल्या गॅरेज दुकानाच्या पत्र्याच्या शेडमध्ये शुक्रवारी रात्री अनोळखी इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली तर मयत इसम अनोळखी असून त्यांच्या अंगावर कपडेही नसल्याने ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !