स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भुसावळात सपकाळे दाम्पत्यातर्फे माजी सैनिकांचा सत्कार
भुसावळात सैनिक भवनाची लवकरच निर्मिती ः आमदार संजय सावकारे
भुसावळ : माजी सैनिकांनी मागणी केल्यानुसार भुसावळात लवकरच सैनिक भवन उभारण्यात येईल, अशी घोषणा भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते सतीश सपकाळे यांनी आयोजीत केलेल्या माजी सैनिकांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार म्हणाले की, सैनिकांचे त्याग व बलिदान यांच्यामुळेच आपले स्वातंत्र्य अबाधीत असून माजी सैनिकांची मागणी लवकरच पूर्ण करण्यात येईल.
50 स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार
प्रभाग क्रमांक आठच्या माजी नगरसेविका अनिता सतीश सपकाळे व सामाजिक कार्यकर्ते सतीश सपकाळे यांच्या वतीने शहरातील 50 माजी सैनिकांचा शुक्रवारी सन्मान करण्यात आला. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारींसह मान्यवरांची उपस्थिती होती. दरम्यान, कार्यक्रमापूर्वी आमदार व पदाधिकार्यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली काढण्यात आली.

