यावलमध्ये पेहरन मिरवणुकीने वेधले शहरवासीयांचे लक्ष


The Pehran procession in Yaval attracted the attention of the city dwellers यावल : पेहरन उत्सवानिमित्त तब्बरूक (पवित्र वस्त्र) ची शहरातील डांगपूरा मन्यार वाडा भागातून शनिवारी उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. भरपावसात देखील हजारोेंच्या संख्येत भाविक सहभागी झाले. सर्वधर्मीय बांधवांनी या ठिकाणी या पवित्र वस्त्राची सजविलेल्या डोलीतून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दाखल होत दर्शन घेतले. या उत्सवात राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन देखील बघायला मिळाले.

दुकानांवर रोशनाई : शहर सजले
मिरवणुकीदरम्यान पेहरन-ए-शरीफच्या डोलीखालून निघतांना भाविक मन्नत (मागणे) मागतांना दिसले. या मिरवणुकीत वाघांचा सजीव देखावा व विविध लेझीमसह टाळ पथकांनी लक्ष वेधले. विविध प्रकाराचे 10 वाद्य वृंदाचे पथके या मिरवणुकीत सहभागी झाले. शहर हिरव्या पताकांनी सजले होते तर दुकांनावर रोषनाई करण्यात आली. जिल्ह्या-परजिल्ह्यातून भाविक शहरात उत्सवानिमित्त दाखल झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक राकेश मानगावकरसह कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
यशस्वीते करीता उत्सव समिती अध्यक्ष बासीत खान असलम खान, उपाध्यक्ष शेख मोहसीन शेख नय्यर, नदीम खान साबीर खान, कार्याध्यक्ष कासीम खान नासीर खान, खजिनदार रमीज शेख बशीर,सचिव शाहरुख खान इब्राहिम खान, शाहिद खान शरीफ खान, युनुस बिस्मिल्ला पिंजारी, कासीम खान अकरम खान, अतीक खान खालीद खान, शोएब खान ईब्राहिम खान, मीनाज शेख ईकबाल, शेख तन्वीर शेख निजान आदींनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !