स्वीप्ट-आयशरमध्ये अपघात : सहा जण जागीच ठार

पहाटेच्या सुमारास अपघात : मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश


Accident in Swept-Eicher : Six Killed On The Spot पाटोदा : भल्या पहाटे भरधाव स्वीप्ट व आयशर वाहने एकमेकांवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा प्रवासी ठार झाले. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. पाटोदा- मांजरसुबा महामार्गावरील बामदळे वस्तीजवळ रविवारी पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला. मयत प्रवासी हे लग्न सोहळ्यासाठी पुण्याकडे निघाले होते तर मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे.

पोलिसांची अपघातस्थळी धाव
अपघातस्थळी पाटोदा ठाण्याचे सहायक निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार व सहकार्‍यांनी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठविले. या घटनेने लग्नसोहळा व जीवाचीवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

समोरा-समोर धडक
जीवाचीवाडी (ता.केज) येथील रामहरी चिंतामण कुटे यांचे कुटुंबीय लग्नसोहळ्यासाठी पुण्याला जात होते. बामदळे वस्तीवर टेम्पो व कारची समोरासमोर धडक झाली. यात सहा जण ठार झाले आहे. टेम्पोच्या खाली कार घुसली होती ती काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. मृतांत दोन लहानग्यांचा समावेश आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !