भुसावळात रोटरी क्लब ऑफतर्फे जनजागृती रॅली


भुसावळ : शहरात रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्सच्या वतीने भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीला भुसावळ विभागाचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार आणि पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी झेंडी दाखवून सुरुवात केली.

विविध शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग
जनजागृती रॅलीत शहरातील डी.एल.हिंदी विद्यालय, बियाणी स्कूल, अहिल्यादेवी कन्या विद्यालय, ताप्ती पब्लिक स्कूल, महाराणा प्रताप विद्यालय, आदर्श हायस्कूल, स्वामी विवेकानंद विद्यालय, म्युनिसिपल हायस्कूल या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक तसेच शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गजानन पडघण, दीपनगरचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर, रोटरी माजी प्रांतपाल राजीव शर्मा, पिंकेथॉन, महिला क्रीडा मंडळ, जय गणेश जेष्ठ नागरीक संघ, अष्टभुजा जेष्ठ नागरिक संघ, राधाकृष्ण प्रभात फेरी आदी समाजसेवी संस्थांचे सदस्य उपस्थित होते.

यांनी यशस्वीतेसाठी घेतले परीश्रम
यशस्वीतेसाठी रोटरी रॉयल्सचे अध्यक्ष प्रसन्न पांडे, सचिव सागर विसपुते, उमेश नेमाडे, राजेंद्र यावलकर, गणेश फेगडे, लोकेश कन्सल, अनंत वाटपाडे, विनोद तायडे, धीरज मुळे, किरण पाटील, अमित जैन, डॉ.सुरज भोळे, सौरभ अग्रवाल, मोहन पाटील, महेश फालक, डॉ.राजेश मानवतकर, भुपेंद्र शर्मा, महेश झंवर आदी सदस्यांनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !