भुसावळात आज सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचा सत्कार


भुसावळ : नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नेपाळ अ‍ॅथलेक्टीक्स मैदानी 2022 या स्पर्धेत शहरातील प्रथमेश ठाकूर या खेळाडूने शंभर मीटर रनिंगमध्ये सुवर्णपदक पटकावून भुसावळची मान उंचावल्याने त्याचा सहृदय सत्कार शहरातील शिवाजी नगर भागातील आगाखान वाड्यात स्वातंत्र्यदिनी सोमवारी दुपारी 12 वाजता होत आहे.

यांची राहणार कार्यक्रमास उपस्थिती
श्री सिद्धीविनायक फाऊंडेशन व शिखर एनजीओ यांच्या सौजन्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे असतील. प्रसंगी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ निरीक्षक संदीप चिद्रवार, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, हाजी शरीफ ठेकेदार आदींची उपस्थिती असेल. कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन श्री सिद्धीविनायक फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख व शिखर एनजीओचे अध्यक्ष रफिक शेख यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !