One thousand two-wheeler rally to welcome Aditya Thackeray : Vaishali Suryavanshi आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी एक हजार दुचाकींची रॅली निघणार : वैशाली सूर्यवंशी


One thousand two-wheeler rally to welcome Aditya Thackeray : Vaishali Suryavanshi पाचोरा : शिवसेनेच्या युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे शनिवार, 20 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता पाचोर्‍यात येत आहेत. हुतात्मा स्मारकास भेट दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थ या शिवसेना कार्यालयाजवळ संवाद साधतील. त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. स्वागतासाठी एक हजार दुचाकींची रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार स्व.आर.ओ. तात्या यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी गुरुवारी पाचोर्‍यात आयोजित पत्रपरिषदेत दिली.

यांची होती उपस्थिती
यावेळी उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड. अभय पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, माजी जि. प. सदस्य उद्धव मराठे, राजेंद्र साळुंखे, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख रमेश बाफन, नाना वाघ उपस्थित होते.

उद्या जळगावात होणार आगमन
आदित्य ठाकरे यांचे 20 रोजी सकाळी 11 वाजता जळगाव येथे आगमन होईल. सामनेर, लासगाव, नांद्रा, हडसन, खेडगाव (नंदीचे), बिल्दी, गोराडखेडा येथील स्थानिक शिवसैनिक त्यांचे स्वागत करतील व मोठ्या संख्येने महिला औक्षण करणार आहेत.

एक हजार दुचाकीस्वारांची निघणार रॅली
सामनेर येथून 500 दुचाकींची रॅली पाचोरा येथील वरखेडी नाक्यापर्यंत येईल. तेथून तालुका व शहरातून पुन्हा 500 दुचाकी रॅलीत सहभागी होतील. भडगाव रोडवरील महाराणा प्रताप चौकात आल्यानंतर महाराणा प्रताप महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन होईल. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन शिवतिर्थनजीक पोहोचणार आहेत. शिवसैनिक व नागरिकांनी यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन वैशाली सूर्यवंशी यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !