कंबोज, रश्मी शुक्ला फडणवीसांच्या भेटीला


मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबद्दल ट्विट करुन खळबळ उडवून देणारे भाजप नेते मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले आहेत. तर, फोन टॅपिंग प्रकरणातील आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या देखील सागर बंगल्यावर दाखल झाल्या आहेत. मोहित कंबोज आणि रश्मी शुक्ला हे दोघे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. मोहित कंबोज यांनी आज आणखी दोन ट्विट करत इशारा दिला होता. 2019 च्या विधानसभा निवडणूक आणि सत्तास्थापनेच्या दरम्यान फोन टॅपिंग केल्याचा आरोप असणार्‍या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्यानं भेटीत नेमकं काय चर्चा होणार याकडे लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !