सकल लेवा पाटीदार समाजाचा विश्वस्तरीय वधूवर परीचय मेळावा डिसेंबरमध्ये


भुसावळ  : सकल लेवापाटीदार समाजातील विवाह इच्छुकांचा विश्वस्तरीय वधूवर परीचय मेळावा लेवा नवयुवक संघ, जळगावद्वारा रविवार, 4 डिसेंबर सकाळी 10 वाजता जळगावातील एकलव्य क्रीडा संकुल, एम.जे.कॉलेजमागे येथे होणार आहे.

नाव नोंदणीसाठी सहभागाचे आवाहन
या मेळाव्यात देश व देशाबाहेरील उद्योग, नोकरी, व्यवसायानिम्मित राहणारे विवाह इच्छुक वधू-वर, पालक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. वधू-वर सूचित शेतकरी, व्यावसायिक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, लिपिक, घटस्फोटित, विधूर, विधवा, अपंग यांनी नावनोंदणी करावी. सूचित नावनोंदणीसाठी लागणारे अर्ज – आपले परीवार सार्वजनिक वाचनालय, लक्ष्मी नगर, वांजोळारोड ,भुसावळ येथे मिळतील, असे शांताराम पाटील, प्रमोद सरोदे, पराग पाटील, श्रीकांत पाटील व संचालक मंडळाने कळवले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !