माजी मंत्री खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त बोदवडला 24 ते 29 दरम्यान भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन


On the occasion of the birthday of ex-minister Khadse, a grand employment fair was organized at Bodwadla from 24 to 29.
बोदवड :
शहरात 24 ते 29 दरम्यान माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात करण्यात आले आहे. जास्तीत-जास्त बे रोजगारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन रामदास पाटील यांनी केले आहे.

सिलेक्ट झालेल्या तरुणांना मिळणार विविधांगी सुविधा
मेळाव्यात सिलेक्ट होणार्‍या तरुणांना एस.एस.प्रा.लि.कंपनीतर्फे नोकरी दिली जाणार आहे. भविष्य निर्वाह निधी, परीवारास वैद्यकीय सुविधा, ग्रॅज्युटी, पेन्शन, विधवा पेंशन, अनाथ पेंशन, वेळोवेळी प्रमोशन व योग्यतेनुसार भत्ते दिले जातील.

मुक्ताईनगर मतदारसंघातील तरुणांना प्रथम प्राधान्य
मुक्ताईनगर मतदारसंघातील तरुणांना प्रथम प्राधान्य दिले जाणार असून महाराष्ट्रातील तरुणही यात सहभागी होवू शकणार आहेत. बाहेरील एजंटांपासून सतर्क रहावे, असे आवाहन कमांडेंट कार्यालय, पुणेतर्फे करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !