राष्ट्रवादी प्रदेशाध्यांच्या उपस्थितीत पक्षात वाढले इनकमिंग

माजी मंत्री खडसेंच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांनी टाकला विश्वास


मुक्ताईनगर : जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक बैठकीप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुक्ताईनगर येथे शनिवारी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी मुक्ताईनगर शहरातील असंख्य मुस्लिम समाजातील युवकांनी आमदार एकनाथराव खडसे व जिल्हा बँक माजी अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवक शहर प्रमुख बबलू सापधरे व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला.

यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
जुुबेर अली, इरफान खान, अजहर आतीश, कौसर अली, शोएब पठाण, इमरान शाह, जुबेर खान, मुश्ताक मन्यार, अन्नू पेंटर, ईस्माइल मन्यार, ईस्माइल शाह, शाहरुख शाह, हमजा शाह, अकरम बागवान, बबलू भांजा, रईस, शैख सलमान, असलम शाह, उस्मान अली, साबीर अली, अशफाक आणि समीर या युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !