खाजगी प्राथमिक महासंघ जिल्हा सदस्यपदी देव सरकटे


भुसावळ : खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, भुसावळ तालुका कार्यकारीणीची ऑनलाईन सभा नुकतीच उत्साहात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष गणेश लोखंडे होते. सभेत सर्वानुमते देव सरकटे यांची महासंघाच्या जिल्हा सदस्यपदी निवड करण्यात आली.

यांची सभेला उपस्थिती
तालुका कार्यकारीणीत सुनंदा खरे, पुष्पा दानी, राकेश रानडे या सदस्यांची सुद्धा नवीन नियुक्ती करण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव जीवन महाजन, भुसावळ तालुका सचिव भूषण झोपे, जिल्हा सदस्य विजय झोपे यांच्यासह तालुका कार्यकारिणीतील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन भूषण झोपे तर आभार नरेश मुर्‍हेकर यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !