Big News : Administrative Board of Jalgaon District Milk Union invalid मोठी बातमी : जळगाव जिल्हा दूध संघातील प्रशासक मंडळ अवैध

न्यायालयाने दिला निर्णय : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची माहिती


Big News : Administrative Board of Jalgaon District Milk Union invalid जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी दूध संघातील न्यायालयीन वादात न्यायालयात पोहोचल्यानंतर न्यायालय काय निकाल देणार याकडे लक्ष लागले असतानाच न्यायालयाने संचालकांच्या बाजूने निर्णय देत प्रशासक मंडळ अवैध ठरवले असून ते बरखास्त झाल्याची माहिती आमदार एकनाथराव खडसे यांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी बोलताना दिली.

सरकारने दिले होते चौकशीचे आदेश
जळगाव जिल्हा दूध संघातील वाद हायकोर्टात पोहोचला होता. राज्य सरकारने यावर प्रशासक मंडळ बसवून या मंडळाने कारभार हाती घेतला होता. संचालक मंडळाचे अधिकार काढण्यात आले होते तसेच संचालक मंडळाच्या कालावधीतील व्यवहारातील कथित अनियमिततेवरून राज्य सरकारने चौकशीचे आदेश देखील जारी केले होते.



संचालक मंडळ पुन्हा कामावर : खडसे
या संदर्भात मंगळवारी उच्च न्यायालयाने निकाल दिला असून याबाबतची माहिती आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली. ते म्हणाले की, न्यायालयाने संचालक मंडळाचे म्हणणे मान्य करून प्रशासक मंडळ अवैध असून ते बरखास्त करण्यात यावे, असा निकाल दिला असून संचालक मंडळ पूर्ववत कामावर आल्याचे खडसे यांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले. या संदर्भातील माहिती आपण लवकरच प्रसारमाध्यमांना देणार असल्याचेही माजी मंत्री खडसे म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !