भुसावळातील बियाणी चेंबर्समध्ये विघ्नहर्त्याची विधीपूर्वक स्थापना
भुसावळ : शहरातील बियाणी चेंबर्समध्ये बुधवार, 31 रोजी विघ्नहर्त्या गणरायाची विधीवत सालाबादाप्रमाणे स्थापना करण्यात आली. यावेळी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे चेअरमन मनोज बियाणी यांनी सौभाग्यवती तथा बियाणी गु्रपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी सोबत विधीवत पूजन केले. बाप्पाच्या स्थापनेने बियाणी चेंबर्समध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
बाप्पांचा जयघोष
बियाणी चेंबर्स परीसरातील भाविकांनी यावेळी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत बाप्पांचे स्वागत केले. पर्यावरणपूरक गणेशाची बियाणी चेंबर्समध्ये स्थापना करण्यात आली. प्रसंगी बियाणी ग्रुपचे उपाध्यक्ष विनोद बियाणी, संचालक रोनक बियाणी, पियुष बियाणी, गोपाळ ठाकूर, राजू मोरे, जिवीका ठाकूरसह बियाणी चेंबर्सचे कर्मचारी उपस्थित होते. बियाणी चेंबर्समध्ये गेल्या 27 वर्षांपासून बाप्पांची विधीवत स्थापना करण्यात येत आहे.

