भुसावळातील महाराणा प्रताप विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात


भुसावळ : महाराणा प्रताप विद्यालयात श्रींची विधीवत स्थापना करण्यात आली असून पाच दिवसीय गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचे प्रकटीकरण करण्यासाठी शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सोनू (प्रभाकर) मांडे उपस्थित होते.

यांची प्रमुख उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून कला क्षेत्रातील कलाकार व शाळेचे माजी विद्यार्थी उमेश गोरधे व दर्शन गुजराथी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, व्यसनमुक्ती, गोंधळ, दिंडी अशा वेगवेगळ्या कला, ग्रुप डान्स सादर केले. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक सुरेश शिंदे, पर्यवेक्षक नारायण घोडके तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होतया. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक वर्गही उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी-शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !