भानखेडा, विचवा शाळेतून अंतर्नादच्या ‘एक दुर्वा समर्पणाच्या’ उपक्रमास सुरुवात

बोदवड तालुक्यातील 104 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप


भुसावळ : अंतर्नादने सामाजिक भान जपून एक दुर्वा समर्पणाची हा उपक्रम हाती घेतला आहे. यंदा उपक्रमाचे सहावे वर्ष आहे. त्यात समाजातील जास्तीत जास्त घटकांनी सहभागी होऊन गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे अपेक्षित आहे. उपेक्षित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असे उपक्रम निश्चितच पूरक ठरतील. अंतर्नाद प्रतिष्ठान राबवत असलेला ‘एक दुर्वा समर्पणाची उपक्रम समाजासाठी आदर्शवत उपक्रम आहे, असा सूर बोदवड तालुक्यातील भानखेडा आणि विचवा शाळेत मान्यवरांनी व्यक्त केला.

जीवन समृद्ध करणारी कला
अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवात ‘एक दुर्वा समर्पणाची’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात बुधवारी बोदवड तालुक्यातील भानखेडा आणि विचवा येथील जिल्हा परीषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. वाचन ही जीवन समृद्ध करणारी कला आहे. ती विद्यार्थी दशेत आत्मसात करणे सुलभ होते. अंतर्नादने गरज ओळखून जो उपक्रम राबवला आहे, तो पथदर्शी आहे, असे समन्वयक ज्ञानेश्वर घुले यांनी नमूद केले. प्रमुख पाहुणे म्हणून भानखेडा येथे सरपंच अनिल मोरे, शा.शि.स.अध्यक्ष अशोक निकम, उपाध्यक्ष उमा सुरवाडे, पोलिस पाटील विठ्ठल निकम, ग्रामपंचायत सदस्य मुकूंद निकम, मुख्याध्यापक सुभाष इंगळे, विचवा जि.प.शाळा येथे शा.व्य.स.अध्यक्ष प्रमोद तायडे, मुख्याध्यापक कविता पाटील यांची उपस्थिती होते. अंतर्नादचे संजय भटकर यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रकल्पप्रमुख समाधान जाधव यांनी प्रास्ताविक केले.आभार सह समन्वयक देव सरकटे यांनी मानले.

104 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
उपशिक्षक वैशाली वानरे, उदयसिंग पाटील यांच्यासह ग.स.सदस्य योगेश इंगळे, प्राथमिक शिक्षक सोसायटी संचालक प्रदीप सोनवणे, कुंदन वायकोळे, विक्रांत चौधरी, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांचे सहकार्य लाभले. शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या 104 विद्यार्थ्यांना पाट्या, सचित्र बालमित्र, वह्या, पेन्सील, पाटी पेंसील, पेन असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !