यावल गटविकास अधिकारी म्हणून एकनाथ चौधरी यांनी स्वीकारला पदभार
यावल : यावल पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून एकनाथ त्र्यंबक चौधरी यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. गत काही दिवसांपासून यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पद हे रीक्त होते. प्रभारी पदभार डॉ. मंजुश्री गायकवाड यांच्याकडे होता मात्र आता यावल पंचायत समितीला प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून चौधरी लाभले आहेत.
कामांना देणार प्राधान्य
शुक्रवारी सकाळीच एकनाथ चौधरी यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आगामी काळात पंचायत समिती स्तरावरील विविध कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी आपले प्राध्यान्य असेल, असे चौधरी यांनी सांगितले.

