महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या वतीने संगीता बियाणी यांना विशेष पुरस्कार


भुसावळ : महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या वतीने देण्यात येणार्‍या पुरस्कारासाठी येथील डॉ.संगीता मनोज बियाणी यांची निवड करण्यात आली. बियाणी यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव
2019-2020 या वर्षात महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या वतीने देण्यात येणार्‍या विशेष कामगिरी पुरस्कारामध्ये त्यांची भुसावळमधून डॉ. संगीता मनोज बियाणी यांची निवड झाली. भुसावळसारख्या छोट्या शहरात राहूनही शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असून या कार्याची दखल घेत त्यांची महाराष्ट्र माहेश्वरी सभेच्या वतीने विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल डॉ.संगीता बियाणी यांचे संपूर्ण समाजात कौतुक होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !