भुसावळातील म्युनिसीपल हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण


भुसावळ : नगरपरीषद भुसावळ संचलित म्युनिसिपल हायस्कूलमध्ये शाळेच्या माजी विद्यार्थिनी कै.सौ.मंजुषा सुधाकर नारखेडे पूर्वाश्रमीच्या रेखा भास्कर भंगाळे यांचे स्मृतीप्रीत्यर्थ शाळेतील दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय येणार्‍या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस सुधाकर फकीरा नारखेडे यांच्याकडून देण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
पूजा शिवाजी मतलाने व निवृत्ती रघुनाथ जगताप यांनी प्रथम क्रमांक मिळवल्याने प्रयेकी अकराशे एक्कावन्न रुपये, द्वितीय बक्षीस राजरत्न राजू वाघ यास 751 रुपये व तृतीय क्रमांकाचे बक्षीस फरीन वसीम बागवान यास 551 रुपये धनादेशाद्वारे देवून गौरवण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक ललितकुमार फिरके होते. यावेळी वरीष्ठ लिपिक राजेंद्र चौधरी, प्रवीण चौधरी, वरीष्ठ शिक्षक एन.बी.वाडे, के.पी.बेंडाळे, डॉ.प्रदीप साखरे, नाना पाटील होते. कार्यक्रम प्रसंगी सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.प्रदीप साखरे यांनी व आभार नाना पाटील यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !