Two Railway engines of a freight train entered the field मालगाडीचे दोन रेल्वे इंजिन शेतात शिरले
सोलापूर : मालगाडीचे डबे लूप लाईनवरील रेल्वे रुळावरुन घसरल्यानंतर थेट शेतात घुसले आहेत. त्याबाबतचा व्हिडीओ समोर आला असून करमाळा तालुक्यातील केम जवळ हा अपघात रविवारी सकाळी झाला. शेतात लोकवस्ती किंवा व्यक्ती नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
शेतात शिरले इंजिन
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातल्या केम गावाजवळ सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणारी मालवाहू गाडीचे रेल्वे इंजिन थेट शेतात शिरले. याबाबतचा व्हिडिओ सोशल मिडीयावरही आला आहे. रविवारी सकाळच्या सुमारास केम या गावाजवळील शेतात सिमेंट भरलेल्या रेल्वेचे इंजिन रूळ सोडून थेट शेतात घुसले.

अपघाताची चौकशी
हा अपघात नेमका कुणाच्या चुकीने झाला, याचाही आता तपास केला जाईल. मात्र सध्या अपघातग्रस्त रेल्वेतील सामान, रेल्वेरुळावरुन घसरलेले डबे आणि इतर यंत्रणा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रेल्वेचे अधिकारी आणि बचाव पथकाकडून पुढील गोष्टी सुरळीत व्हाव्यात, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
