जळगावात उद्धव ठाकरेंना नवनीत राणांचा सूचक इशारा : कोण किती ताकदवर लवकरच कळणार
Navneet Rana’s pointed warning to Uddhav Thackeray in Jalgaon: We will soon know who has what power जळगाव : तुम्ही शिवसेनेत असाल तर मीदेखील विदर्भाची सून असून आमना-सामना तर लवकरच होईलच, त्यात कळेल की कोण किती ताकदवान आहे, अशा शब्दात खासदार नवनीत राणांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा दिला. सोमवारी सायंकाळी जळगावात नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याहस्ते महाराणा प्रताप मंडळात हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम झाल. यावेळी राणा बोलत होत्या.
ठाकरेंना पुन्हा दिला इशारा
नवनीत राणा आपल्या आक्रमक शैलीत म्हणाल्या की, तू ठाकरे है तो मैं भी राणा हूं. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. उद्धव ठाकरेंनी सत्तेचा दुरुपयोग केला. तुरुंगामधून निघाल्यावर त्यांना वाटलं मी तुटून जाईल, काही बोलता येणार नाही, आमच्याविषयी काही बोलणार नाही. पण ज्या दिवशी तरुंगामधून बाहेर पडले. तेव्हा माझ्यात जास्त ताकद आली होती. चौदा दिवस, बारा-बारा तास मी तुरुंगात मी हनुमान चालिसेचं पठण केले.

ठाकरेंकडे आता कार्यकर्ताही नाही
प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट मी हनुमान चालिसेमध्ये मी पाठ करत होते. जर माझ्या भक्तीत थोडीही ताकद असेल, तर हनुमंत राय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवेल. आता त्यांच्या घरात उभं राहायला सुद्धा कार्यकर्ता उरला नाही, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली .
