रावेरात मिरवणूक मार्गावर रॅपीड अॅक्शन फोर्सचे पथसंचलन
रावेर : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातून रॅपीड अॅक्शन फोर्सने मंगळवारी पथसंचलन केले.
विविध मार्गावरून पथसंचलन
रावेर पोलिस ठाण्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, उटखेडा रोड, संभाजी नगर, बंडू, इमामवाडा, चावडी भाग, कोतवाल वाडा, नागझिरी रोड, रसलपूर, महात्मा फुले चौक, स्वामी विवेकानंद चौक, राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक, कारागीर नगर, बारी वाडा, भोई वाडा, गांधी चौक, डॉ.हेडगेवार चौक मार्गे पथसंचलन करण्यात आले.

पोलिस प्रशासनाचा सहभाग
यावेळी शीघ्र कृती दलाचे जवान, आरसीपी जवान, रावेर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान या पथसंचलनात सहभागी झाले. रावेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे, रॅपीड अॅक्शन फोर्सचे डेप्यूटी कमांडर शशिकांत रॉय, असि.कमांडर संतोष यादव, इन्स्पेक्टर जी.एस.झारीया, उपनिरीक्षक अजयकुमार सिंग, रामचंद्र पाटील, पोलिस फौजदार मनोहर जाधव, सचिन नवले, विशाल सोनवणे उपस्थित होते.
