चिनावलला सातव्या दिवशी गणरायाला निरोप
सावदा : चिनावल येथे सातव्या दिवशी गणरायाला मोठ्या भक्तीभावाने निरोप देण्यात आला. चिनावल गावातील 16 गणेश मंडळांनी अत्यंत शिस्तबद्ध व शांततामय रीतीने गणरायाचे मिरवणूक काढून विसर्जन केले. पोलिस प्रशासनाने दिलेल्या नंबर प्रमाणे सकाळी 11 वाजता सुरू झालेली मिरवणूक रात्री 10 नंतर शांततेत सुरू होती.
अपर अधीक्षकांची भेट
गावातील सुयोग, नूतन, नवयुवक, समर्थ, परीस, नवनगर, विठ्ठल, श्री विठ्ठल, न्यू भारत, क्रांती, हिमधवल, आदर्श, न्यु प्रभात, अमर, जागृती, भारत, प्रीती ही गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली. अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, फैजपूर विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, सावदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक देविदास इंगोले, उपनिरीक्षक समाधान गायकवाड, जावळे, रावेर, फैजपूर, वरणगाव, निंभोरा येथील पोलिस अधिकारी चिनावल येथे तळ ठोकून होते. पोलिस पाटील निलेश पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष योगेश बोरोले, सरपंच, उपसरपंच परेश महाजन, यांच्यासह गोपाळ नेमाडे, श्रीकांत सरोदे, बापू पाटील, हयातखान हाजी वायद खान, शे.निसार हाजी कुतूबुद्दीन, शे.ईरफफान हाजी कुतूबुद्दीन, अस्लम खान हाजी शब्बीर खान, शे.अजगर, सागर भारंबे, किशोर बोरोले, दामोदर महाजन, संदीप महाजन, भास्कर सरोदे, संदीप टोके, गोपू नेमाडे, योगेश राजाराम भंगाळे, राजेश महाजन, ठकसेन पाटील, सतीश माळी तसेच खिरोदा विभागाचे मंडळाधिकारी जे.डी.भंगाळे, ग्रामविकास अधिकारी संतोष सपकाळे, तलाठी लीना राणे, देवेंद्र पाटील, यशवंत डहाके, विनोद पाटील, मजहर तडवी आदींनी विसर्जन मिरवणुकीसाठी पार पडण्यासाठी परीश्रम घेतले.े

