Damage To Banana Crops Due To Storm In Muktainagar Taluka मुक्ताईनगर तालुक्यात वादळी वार्याने केळी पिकांचे नुकसान
Damage To Banana Crops Due To Storm In Muktainagar Taluka कुर्हाकाकोडा : मुक्ताईनगर तालुक्यातील पंचाने, मुंडोळदे तसेच तापी किनार पट्टी भागात शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारा सझालेल्या जोरदार वादळी पावसामुळे केळीसह अन्य पिकांना मोठा फटका बसल्याने शेतकर्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
पंचनाम्यासह भरपाईची मागणी
शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वार्यासह पावसामुळे मुंडोळदे, पंचाने परीसरातील शेतकर्यांच्या शेतातील केळी, कपाशी, तूर, ज्वारीसह अन्य पिकांचे नुकसान झाले. शेकडो एकरावर पिकांना फटका बसल्याने शासनाने शेती शिवारातील नुकसानीचे पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळवून शेतकर्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारने घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड.पवनराजे पाटील यांनी केली आहे.

