भुसावळात शांततेत श्री विसर्जन : पोलिस प्रशासनाच्या वतीने कट्टर शिवसैनिक नमा शर्मा यांचा सन्मान


भुसावळ: भुसावळ शहरातील श्री विसर्जन अत्यंत शिस्तबद्धपणे व शांततेच्या मार्गाने पार पडल्याबददल सार्वजनिक गणपति उत्सव समितीच्या पदाधिकार्‍यांचा पोलिस प्रशासनाच्या वतीने विशेष सहृदय सन्मान करण्यात आला. श्री विसर्जन मिरवणुका पार पडण्यासाठी भुसावळातील कट्टर शिवसैनिक नमा शर्मा यांच्यासह सार्वजनिक गणपती उत्सव समितीच्या पदाधिकार्‍यांनी विशेष सहकार्य केले.

यांचा झाला सन्मान
अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याहस्ते भुसावळातील कट्टर शिवसैनिक नमा (उमाकांत) शर्मा, रीतेश जैन, किरण मिस्त्री, पूजन महाजन, आदित्य शर्मा, नितीन गुरव, सोनी ठाकुर, चेतन शर्मा, मुकेश गुंजाळ आदींचा लक्ष्मी चौकात सन्मान करण्यात आला. यंदा सार्वजनिक गणेशोत्सव समितीतर्फे प्रत्येक मंडळातील अध्यक्ष, उपाध्यक्षांचाही सन्मान करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !