भुसावळातील अखिल भारतील लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे 350 गुणवंतांचा सत्कार


भुसावळ : अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे लेवा पाटीदार समाजातील दहावी, बारावी, पदवी-पदविका व पदव्युत्तर व विविध विद्या शाखांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंतांचा गुणगौरव नुकताच संतोषी माता सभागृहात करण्यात आला. अध्यक्षस्थानी कुटुंबनायक रमेश विठू पाटील होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर आमदार राजू मामा भोळे, आमदार संजय सावकारे, महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाशराव पाटील, नाहाटा महाविद्यालयाचे चेअरमन महेश फालक, गिरीष महाजन, चेतन पाटील, श्रेयस इंगळे, महासंघाचे उपाध्यक्ष राजेश सुधाकर चौधरी, शहराध्यक्ष देवा वाणी व्यासपीठावर प्रमुख अतिथी होते.

उद्योग धंद्यांकडे वळण्याचे मान्यवरांचे आवाहन
आमदार राजूमामा भोळे यांनी लोहापुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले तर आमदार सावकारे यांनी ऑनलाईन अभ्यासापेक्षा पुस्तक वाचन करा, अधिकारी बना, शिक्षण घेऊन नोकरी न करता उद्योगधंद्याकडे वळा, असे आवाहन केले. कुटुंबनायकांनी कितीही उच्च पदावर जा पण आपल्या आई-वडिलांना विसरू नका असे सांगून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
प्रास्ताविक अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश पाटील तर सूत्रसंचालन प्रा.मुकेश चौधरी यांनी केले. यशस्वीतेसाठी गुणगौरव समितीचे अध्यक्ष श्याम भारंबे, उपाध्यक्ष रुपेश चौधरी, सोशल मीडिया प्रमुख शुभम पाटील, ओम वाणी, संकल्प वाणी, निलेश भारंबे, सागर भारंबे, राहुल नेमाडे, यश बेंडाळे, विनय चौधरी, पूर्वेश चौधरी, गणेश चौधरी, ऋतीक फालक, नचिकेत फालक, रोहित नेमाडे, गिरीश चौधरी, भूषण किरंगे, नरेंद्र भडके, निलेश राणे, शुभम झांबरे, कोमल चौधरी, पवन शिंदे, चेतन आंबोले, लोकेश बेंडाळे आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !