Instead of being the handiwork of Memon, we will be the handiwork of Narendra Modi-Amit Shah : Chief Minister Eknath Shinde मेमनचे हस्तक होण्यापेक्षा आम्ही नरेंद्र मोदी-अमित शहा यांचे हस्तक होऊ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


Instead of being the handiwork of Memon, we will be the handiwork of Narendra Modi-Amit Shah : Chief Minister Eknath Shinde औरंगाबाद : मतदारांनी भाजप-सेनेला सत्तेत आणले खरे मात्र यांनी विरोधकांसोबत हातमिळवणी केली. भारताचा शत्रू असलेल्या मेमनच्या कबरीचे उद्दातीकरण यांच्याच काळात झाले. त्यामुळे मेमनचे हस्तक होण्यापेक्षा आम्ही नरेंद्र मोदी-अमित शहा यांचे हस्तक होऊ, असे परखड मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील सभेप्रसंगी व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

आम्ही लोकभावनांचा मान ठेवला
शिंदे पुढे म्हणाले, पन्नास आमदार विरोधकांच्या गोटात जातात हे जगातील एकमेव उदाहरण आहे. आमच्यामागे लाखो लोकांचे आशीर्वाद होता. आम्ही लोकभावनेचा मान ठेवला. आमच्यावर साबणाचे बुडबुडे, अशी टीका विरोधक करत होते. पण, याच साबनाने आम्ही तुमची धुलाई केली. बाळासाहेबांच्या विचारांना पसंती देणारी ही पैठणमधील गर्दी आहे. आमची लढाई सोपी नव्हती. सर्वचजण आमचा कार्यक्रम करायला टपले होते. पण, आमचे पन्नास लोक ठाकरे गटाला अन् मविआला पुरून उरले.

खोक्यांचा हिशेब योग्य वेळी देणार…’
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ’जे करायला नको होते ते त्यांनी केले. मतदार आणि हिंदुत्वाशी गद्दारी, विश्वासघात कोणी केला हे लोकांना माहित आहे. हे राज्य सामान्यांचे आहे, या राज्यात सर्व सामान्यांना न्याय देण्याचे काम आम्ही करत आहोत. शेतकर्‍यांना नुकसानीसाठी भरघोस निधी देत आहोत. आम्ही कामातून उत्तर देत आहोत, म्हणून लोकांचे आम्हाला समर्थन आहे. तुम्ही आमच्यावर पन्नास खोक्यांची टीका करता, पण या खोक्यांचा हिशोब योग्यवेळी देईल,’ असेही शिंदे म्हणाले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !