Big News : Jalgaon Crime Branch Inspector Kiran Kumar Bakale ‘collected in the control room’ मोठी बातमी : जळगाव गुन्हे शाखेने निरीक्षक किरणकुमार बकाले ‘नियंत्रण कक्षात जमा’
Big News: Jalgaon Crime Branch Inspector Kiran Kumar Bakale ‘collected in the control room’ जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांची मंगळवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याने पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. एका समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी लोकप्रतिनिधींनी पोलिस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीअंती ही बदली करण्यात आल्याची चर्चा आहे.
पोलिस वर्तुळात खळबळ
जळगाव गुन्हे शाखा निरीक्षकांचा जिल्ह्यात सर्वाधिक दबदबा असतो हे सर्वश्रृत आहे शिवाय या पदावरील खुर्ची मिळण्यासाठी अधिकार्यांमध्ये मोठी चढाओढदेखील असते मात्र या पदावरील अधिकार्याची पोलिस अधीक्षकांनी तडकाफडकी बदली केल्यानंतर प्रचंड खळबळ पोलिस दलात उडाली आहे.

