मुक्ताईनगरातील सेन्ट्रल बँक शाखा व्यवस्थापकाची तडकाफडकी बदली
खासदार रक्षा खडसे यांच्या तक्रारीची बँक प्रशासनाकडून दखल
Hasty Transfer Of Central Bank branch Manager in Muktainagar मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकरी, व्यापारी इतर ग्राहकांच्या अनेक तक्रारींबाबत खासदार रक्षा खडसे यांनी समस्या मांडण्याकामी तालुक्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा,मुक्ताईनगर, अंतुर्ली व कुर्हा यांच्या शाखा व्यवस्थापकांची बैठक आयोजित केली होती मात्र या बैठकीला मुक्ताईनगर शाखा व्यवस्थापक सुमित कुमार झा हे तब्बल दोन तास उशिराने दाखल झाले शिवाय तक्रारींबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी खासदारांसोबतही असभ्य वर्तन केल्याने त्याबाबतची तक्रार करताच त्यांची बदली करण्यात आली. दरम्यान, नवीन शाखा व्यवस्थापक गोपाळ पाटील हे मुक्ताईनगरात रुजू झाले आहेत.
व्यवस्थापकांविषयी वाढल्या होत्या तक्रारी
खासदारांनी आयोजित केलेल्या बैठकीस मुक्ताईनगर शाखा व्यवस्थापक सुमित कुमार झा हे दोन तास उशिराने दाखल झाले शिवाय खासदार कार्यालयामार्फत दोन वेळा त्यांना निरोप देण्यात आला. बैठकीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत घरी झोपले असल्याने खासदार खडसे यांनी त्यांना शेतकरी, व्यापारी इतर ग्राहकांच्या तक्रारींबाबत विचारणा केळी असता त्यांनी खासदारांसोबत अपशब्द वापरून बैठकीत गैरवर्तन केले. याबाबत खडसे यांनी त्यांची तत्काळ बदली होण्यासंदर्भात सेंट्रल बँक ऑफ इंडिया विभागीय व्यवस्थापक यांना याबाबत दूरध्वनीद्वारे चर्चा केली तसेच लेखी तक्रार केल्यानंतर सुमित कुमार झा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली

