निरीक्षक बकालेंना सेवेतून बडतर्फ करा : वरणगावातील संतप्त मराठा समाजाची मागणी
वरणगाव : जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाने मराठा समाज आक्रमक झाला आहे. गुरुवारी मराठा समाजबांधवानी वरणगावचे सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसूळ यांना निवेदन देत बकाले यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली.
निवेदन देताना यांची उपस्थिती
यावेळी संदीप पाटील, छगन कडू पवार, दीपक मराठे, ज्ञानेश्वर पाटील, डॉ.अनिल पाटील, प्रशांत मोरे, अमोल पाटील, राजेंद्र पाटील, दिनकर राऊत , राहुल देशमुख, सदाशिव पाटील, जालिंदर मराठे, शरद देशमुख, सचिन पाटील, कुलदीप देशमुख, पवन मराठे, प्रतिभा तावडे, विक्रम देशमुख, योगेश पाटील, पंकज पाटील, प्रा.मनोज देशमुख आदी समाजबांधव उपस्थित होते.

